आमची अनोखी मुंबई सफर
आम्ही कुलाबा कॉजवेवर मनसोक्त भटकलो.भरपूर मजा आणि ठरवलेला टाईमपास करून डेक्कन क्वीन साठी छत्रपती टर्मिनसला बसनीच दोघींनी फक्त ८ रुपयात स्टेशन गाठलं. आतापर्यंत असंख्य वेळा मुंबईला आलो,राहिलो पण अशी साधी साधी,मजा आपण आधी का घेतली नाही! निवांतपणे बस मधून जाता-येता एरवी गाडीनी दिसते त्यापेक्षा मला अधिक मुंबई पहाता आली. काही भाग समजले.खूप लोक भेटले.शाळेची मुलं भेटली.मी त्यांच्यातली एक सहप्रवासी आहे,हा आनंद घेत प्रवास करता आला. प्रत्येक उपनगराच्या ठिकाणचे वेगळे बाजार, वेगळी वस्ती पहात पहात आमचा बस प्रवास फारच मस्त झाला.
सध्या मुंबईला जायचं म्हटलं की एक्सप्रेस वे आणि गाडी ठरवूया अशीच चर्चा सुरु होते. आम्ही ठरवलं की, डेक्कन क्वीन च्या साधारण वर्गाचं तिकीट काढू आणि परतीचंही तेच तिकीट काढून पुण्यात रात्री परत येऊ. सुट्ट्या संपून शाळा सुरु होत आहेत.अजून पावसाळा सुरु झालेला नाहीये तोवरच मुंबईला जाऊन येणं असा बेत आपण आखू शकतो. एकदा का पाऊस सुरु झाला की विचारही करता येणार नाही.
डब्यात नेहेमी प्रमाणे नाश्ता न करता, आम्ही Pantry मधे बसून, व्यवस्थित डिश मधे, नाश्ता करावा असं ठरवलं.गप्पा मारत,खंडाळ्याच्या घाटातून,तुरळक पावसाची सर आणि अंगावर तुषार घेत घेत, गरम गरम खाऊन मस्त कॉफी ही घेतली. दादरला आमच्या आवडत्या ठिकाणी जाऊन हवं ते घेउन,जेवून झालं.आता कुलाबा कॉजवे ला पण बसनीच जायचं असं ठरवलं. बस मिळाली १ लीमिटेड. बसायला मस्त जागाही मिळाली. दोघींचं तिकीट फक्त रु.३६/-होतं.
आम्ही कुलाबा कॉजवेवर मनसोक्त भटकलो.भरपूर मजा आणि ठरवलेला टाईमपास करून डेक्कन क्वीन साठी छत्रपती टर्मिनसला बसनीच दोघींनी फक्त ८ रुपयात स्टेशन गाठलं. आतापर्यंत असंख्य वेळा मुंबईला आलो,राहिलो पण अशी साधी साधी,मजा आपण आधी का घेतली नाही! निवांतपणे बस मधून जाता-येता एरवी गाडीनी दिसते त्यापेक्षा मला अधिक मुंबई पहाता आली. काही भाग समजले.खूप लोक भेटले.शाळेची मुलं भेटली.मी त्यांच्यातली एक सहप्रवासी आहे,हा आनंद घेत प्रवास करता आला. प्रत्येक उपनगराच्या ठिकाणचे वेगळे बाजार, वेगळी वस्ती पहात पहात आमचा बस प्रवास फारच मस्त झाला.
साध्या डब्यातून प्रवास, त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीवर भरवसा ठेवूनही आपण मजा करू शकतो असं जाणवलं!
सध्या कोणत्याच व्यवस्थेवर आपला विश्वास राहिलेला नाही.या सफरीत हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत वाजवी दरात बसप्रवास करून मजाही करू शकतो हे अनुभवलं.आपल्या सवयीना बाजूला ठेवून थोडं वेगळं काही करून बघण्याचा आमचा सोस होता. तो अगदी सफल झाला.मुंबई सफरीतला आनंद म्हणूनच निराळा होता.
पुण्यातला महाग पडलेला रिक्षा प्रवास सोडला तर आमची मुंबई सफर अत्यंत कमी खर्चात झाली.सार्वजनिक वाहतूक उत्तम असणं, किती आवश्यक आहे जे जाणवत राहिलं.लिमिटेड,अनलिमिटेड, वातानुकुलीत, अशा निरनिराळ्या सुविधा देणारयाही बस आहेत हे माहिती असूनही फारसा अनुभवच घेतला नव्हता. याचं थोडं श्रेय अजूनही ब्रिटिशांच्या दूरदृष्टीला द्यावं लागतं.
मुंबईला जावं, मजा करावी असं वाटलं तर आता नक्कीच एक चांगला पर्याय मिळाला आहे याचा आनंद आम्हांला मिळाला आहे तो वेगळाच !

No comments:
Post a Comment