आपण मजा करतांना ....
एखाद्या लहानशा कृतीनी काही तरी मोठ्ठ हाती लागणार असं कधी झालंय तुमचं ? पण हे अशक्य नाही असा विश्वास ठेवा.तो विश्वास आपल्या प्रामाणिक प्रयत्नातून मिळतो म्हणजे मिळतोच.
आम्ही असा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा यशच मिळालं. तो अनुभव सगळ्यांनाच खूप मजा देणारा आहे म्हणून...
"मैत्री"चे आम्ही स्वयंसेवक न चुकता दर मंगळवारी ६.३० ते ७.३० पर्यंत कमला नेहरू उद्यानात, विमानाजवळ हिरवळीवर असतो. थोडी थोडकी नाही चक्क १५ वर्षं झाली. एकही मंगळवार चुकलेला नाही. तिथे गप्पा, चर्चा,वाद, आणि काही नव्या कल्पनाही बोलल्या जातात.त्यातलीच एक आहे कल्पना ....
आमच्यातला एक स्वयंसेवक- त्याला आम्ही के.सी. म्हणतो. तो ८-१० वर्षांनी इंग्लंड हून भारतात परत आला. आम्ही सगळे मंगळवारी नक्कीच बागेत असणार म्हणून तिथेच भेटायला आला. त्यानी एक हॉटेल 'रसोई हट' बागेसमोरच सुरु केलंय तिथे चला असं त्याचं निमंत्रण होतं. नक्कीच येऊ ,सगळे मिळून एकदा जाऊ करत ते राहिलं.....
१४ जानेवारीला के.सी.नी पुन्हा एकदा आठवण केली आणि आम्ही सगळ्यांनी त्याच्या हॉटेलमध्ये जायचं ठरवून टाकलं.आम्ही त्याला Soldier's contribution.. किंवा वाटलं तेव्हढे पैसे प्रत्येकानी द्यायचे आणि बिल देऊन उरलेले पैसे "मैत्री"ला देणगी म्हणून द्यायचे अशी एक कल्पना ठरली. ठरल्याप्रमाणे सगळेजण मिटींग नंतर त्याच्या रसोई हट मधे अतिशय मस्त जेवण, चविष्ट मिष्टान्न, आणि सगळ्यांसोबत गप्पा करत प्रत्यक्षातही आणली. जेवल्यानंतर एक टोपी फिरवून त्यात आपापले पैसे प्रत्येकानी ठेवले.आमचा मित्र जे बिल होतं ते घेउन आला. त्यावर सामाजिक कामासाठी जमणारे सर्व आहेत, आपलाच मित्र परिवार म्हणून ४०% सवलत के.सी. नी दिली. मग बिलाचे पैसे वजा जाता, उरलेले पैसे "मैत्री" कडे देणगी म्हणून जमाही केले गेले. अगदी पावती देखील झाली.
आमच्यासाठीच नाही तर कोणी मित्र मंडळी सैनिकी पद्धतीने पैसे देऊन खाणे घेतात आणि उरलेले पैसे सामाजिक कामाला देतात, अशी त्यांनी खात्री पटवली तर आमचा मित्र के.सी. त्यांना देखील अशीच सवलत देईल असे त्याने सांगून टाकले आहे. त्यामुळे
म्हणून शाकाहारी खवय्यांना विनंती आहे....जरूर उत्तम चवीचे 'रसोई हट' मधे खा...आणि जर तुम्ही सामाजिक काम करण्यासाठी पैसे जमवत असलात तर तो तुम्हालाही सवलत देईल. आहे की नाही जाता -जाता मजेत एक मोठ्ठ काम करण्यासाठी जागा?
निधी संकलनासाठी असे "मैत्री" कडे अनेक उपक्रम आहेत. केव्हाही कोणीही हॉटेलमध्ये जाणार असाल तर हे जरूर करून पहा.बिलापेक्षा जास्त असलेली रक्कम सामाजिक कामासाठी देण्यातही एक मजा असते ! आपल्या मजे बरोबर सहजपणे हा अनुभव घेता येईल ...सामाजिक कामाशी अनेकांना जोडता येईल. पाश्चात्त्यांनी या कल्पनेला Kitchen-Table Philanthropy असे नाव दिले आहे.
आपण त्याला कट्टा असे नाव दिले तर काय हरकत आहे? मग कधी आहे तुमचा कट्टा ते ठरवा आणि भेटा आमच्या 'रसोई हट' च्या कट्ट्यावर !