शुभेच्छा कशासाठी !
दर वर्षी नियमित पणे पेट्रोल भाववाढ,रेल्वे तिकीट दरवाढ ,शाळा -महाविद्यालयांची फी वाढ -महागाई,टंचाई, भारताचा विकास दर आता संपूर्ण जगात अमुक अमुक क्रमांकावर अशा बातम्याही अगदी वर्षानु वर्षं तशाच त्याच पद्धतीनी येतात. गुन्ह्यांची संख्या,कोर्टातील प्रलंबित खटले,मुदती पुर्वीच संपणारे अधिवेशन,आणि लोकप्रतिनिधींच्या भत्यात मात्र वाढीची तरतूद.हे देखील दर वर्षी प्रमाणेच ...मागील पानावरून पुढे चालू.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून वर्ष संपणार म्हणून च्या गोष्टी सुरु होतात. कुठे धमाका तर कुठे लूट! पाक्षिकात,मासिकांत,सर्वत्र नवीन वर्षं सुरु होणार म्हणून मागोवा,आढावा,हिशेब मांडले जातात. अगदी वर्षानु-वर्ष असंच सुरु आहे.
अशा सर्व पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा मेसेज,इमेल, भेटकार्ड मात्र नेहेमी प्रमाणेच येऊन उभी ठाकलेली.आता त्यात मजा कसली... असं वाटत रहातं.
मग प्रश्न पडतो...दिनदर्शिकेचे पान संपून जाते..नवीन लावण्याची गरज असते एवढेच शिल्लक आहे का?
करण्याच्या कितीतरी गोष्टी तशाच आहेत.....यामुळे तरी आपण मागे वळून पहावं यासाठी तर हा सगळा..डाव नसेल... नाव मात्र गोंडस...नवं वर्षाच्या शुभेच्छा,!
Friday, 28 December 2012
Monday, 24 December 2012
मी लहान असतांना,"कोंड्याचा मांडा करणे" अशी एक म्हण अगदी सर्रास वापरली जात होती आम्ही ती पाठ केली होती.फार फार वर्षांनी मी त्यावर विचार करत होते.ते ही एक निमित्त झालं म्हणून...
आधी ठरल्याप्रमाणे काल जेवायला ४ लोक येणार होते.अचानक काही कारणांनी दोघंच आले.घरात ल्या सर्वांना तेच परत खाण्याचा कंटाळा येणार,मला वाया घालवलेलं नाही चालणार. मग....
तिच भाजी दुसऱ्या दिवशी खाण्यापेक्षा कटलेट्स करुया ...संपून जाईल, असा विचार केला. त्यात थोडासा ब्रेड घातला. कांदा, आलं-मिरची-लसूण असं वाटण घातलं. कोथिंबीर घातली. टोस्टचा चुरा दोन्ही बाजूला लावून अगदी थोडसंच तेल घालून तव्यावर कटलेट्स भाजली. संध्याकाळी खायला केचप बरोबर मस्त लागली.भाजी संपली आणि ताजा नवा पदार्थही तयार झाला..तोही आवडणारा! असा आमचा कोंड्याचा मांडा वारंवार व्हावा अशीही चर्चा झाली.असंच आमटी वापरून भाजणीचं थालीपीठही अतिशय हलकं-खुसखुशीत होतं.अशा कितीतरी पदार्थांची आता माझ्याकडे यादीच तयार झाली आहे.
Friday, 21 December 2012
काल फेसबुक वर असतांना माधुरी दिक्षित नेने ---आपल्या आवडत्या माधुरीचा सुंदर फोटो दिसला.वाटलं,किती वर्षं किती जणांना तिच्या अभिनयानी, सौंदर्याने भारून टाकलंय.चित्रपट जगतात माधुरीचा असा एक चाहता वर्ग आहे! असं असतानाही ती चित्रपटाच्या आणि भारताच्या पलीकडे स्वतःच्या व्यक्तिगत -खाजगी आयुष्यासाठी ती गेली. अगदी १० वर्षं ! सहसा रुपेरी पडद्यावर दिसलीच नाही. प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या माधुरीला ते किती अवघड होतं .त्या वर्षांत ती आपल्या मुलांना वाढवण्यासाठी वेळ देत होती. त्यात ती रममाण झाली होती.आता मुलं थोडी मोठी झाल्यावर ती पुन्हा एकदा चंदेरी दुनियेकडे येणार अशी चर्चा आहे. त्यासाठी ती स्वतःचं व्यक्तिमत्व, रूप याकडे अधिक लक्ष देत आहे, मेहनत घेते आहे.
आपल्या व्यक्तिगत आयुष्यात घर-मुलं, त्यासाठी आवश्यक त्या भूमिका घेणं -उत्तम रीतींनी त्या जगणं हे ही एक कामच नाही का? मुलांना मोठं होतांना आपली मदत लागते तेव्हाच आपण त्यांच्या पासून लांब जायचं?त्त्यामुळे त्यांचं लहान असणं आणि मोठं होणं दोन्हीतही त्यांच्या सोबत रहाणं आपणच गमवत नाही का!
Subscribe to:
Posts (Atom)