तो आला त्यानी जिंकलं !
तो आमच्याकडे आला आणि "वाघ्या" झाला.त्याला येत्या फेब्रुवारीत दहा वर्ष झाली असती.विषय निघताच डोळे पाणावतात.नको काढायला विषय म्हटलं तर तेही जमत नाही.कारण घरात,बागेत, गच्चीत, अंगणात, गल्लीत,आसपासच्या रस्त्यावर,दुकानांच्या पायरीवर,मारुती ८०० मधे, डी.पि.रस्त्याला, कासुर्डीला, एक-दोन वेळा मुळशीला... किती किती आणि कुठे कुठे तो आमच्या सोबत असायचाच.
आता मागे जाऊ तसतसं आठवणीं अक्षरशः पोतडी पोतडी साठलेल्या आहेत. तो असे पर्यंतच्या प्रत्येक दिवशी काही ना काही घटना घडत असे. पहिले दोन महिने तर प्रज्ञा-मेधा आळीपाळीनी घराबाहेर जायच्या.त्याला औषधं,जेवण-शी-शु ची सवय लागेपर्यंत दोघीही सतत त्याच्या सोबत असायच्या.तो जरा २-३ महिन्याचा झाल्यावरच त्याला आम्ही फिरायला नेणं वगैरे सुरु केलं.मुलींनी आजोबांना त्याच्यावरही एक कविता करायला सांगितलं आणि आजोबांनीही अतिशय प्रेमानी छान रचना केली.
"वाघ्या" म्हणजे धमाल असं एक समीकरणच झालं.आज काय तर त्यानी बटाटा पळवला, कधी काय तर मैत्रिणीच्या चपलेचा अंगठा चावला,बिस्कीट देताना माझा हातच धरला, ड्रेस दातात धरून ठेवला, कमळांच्या मोठया सिमेंटच्या कुंडीत बसला आणि सगळी कमळांची रोपं दातात धरून चावून टाकली, पाण्यात बसून राहिला.एकदा मेधाच्या मागेच लागलं,सहजच काही कारण नव्हतं-पण त्याचा तो खेळ होता.अशा अनेक गोष्टी रोज घडत होत्या.
आता मागे जाऊ तसतसं आठवणीं अक्षरशः पोतडी पोतडी साठलेल्या आहेत. तो असे पर्यंतच्या प्रत्येक दिवशी काही ना काही घटना घडत असे. पहिले दोन महिने तर प्रज्ञा-मेधा आळीपाळीनी घराबाहेर जायच्या.त्याला औषधं,जेवण-शी-शु ची सवय लागेपर्यंत दोघीही सतत त्याच्या सोबत असायच्या.तो जरा २-३ महिन्याचा झाल्यावरच त्याला आम्ही फिरायला नेणं वगैरे सुरु केलं.मुलींनी आजोबांना त्याच्यावरही एक कविता करायला सांगितलं आणि आजोबांनीही अतिशय प्रेमानी छान रचना केली.
त्याच्या पहिल्या वाढदिवसाला २००९ मधे-चक्क सोसायटीचं मैदान आम्ही घेतलं, मैदानावर ओळखीचे-अनोळखी, प्राणीप्रेमी, कुत्रा घेउन आलेले आणि ते बघायला आलेले अशी जत्राच भरली.त्यांना खाऊ देणं,भेट देणं,एकमेकांशी ओळखी करून घेणं-यात आम्ही खूप मजा घेतली.असा वाढदिवस करणार आहे हे समजल्यावर टाइम्स चे वार्ताहर आले होते.मेधा बरोबरत्याचा फोटो चक्क वर्तमानपत्रात झळकला होता."वाघ्या" रोज आम्हांला आनंद देत होता.
मुलींची स्कुटर वाजली की हा दारात स्वागताला हजर,अनिल गावाला सकाळी गेला आणि संध्याकाळी आला तरी प्रचंड आनंद,जसा काही फार दिवस अनिल भेटलाच नाहीये.
त्याच्या खाण्याच्या,खाऊच्या,खेळाच्या, बागेत चक्कर मारण्याच्या,बाहेर फिरायला जाण्याच्या वेळा ठरलेल्याच होत्या,पण कधी थोडासा उशीर झाला तर हा आमच्याकडे बघत बसणार आणि आहे ना लक्षात माझ्या वेळेचं,मग काय चाललंय तुमचं, असे त्याच्या नजरेत भाव- की आम्हीच त्याला 'हो रे जाऊया हं' वगैरे समजूत घालत बसायचो.आमच्या मनांत त्याला काय वाटत असेल हे येणं,आणि आम्ही त्याप्रमाणे वागणं...हे आमच्याही अंगवळणी पडलं होतं.वाघ्याला बोललेलं समजतं असं आमच्या लक्षात येत होतं.सहजच एकदा मी शब्द लिहून काढले तर २०० पेक्षाही जास्त शब्द झाले.
त्याच्या वयात येण्याची कोण चर्चा...वधू संशोधन,त्याचं मैत्रिणीला भेटणं,मग एकीची पिल्लं,दुसरीची पिल्लं.असंख्य फोटो,चर्चा,मित्र-मैत्रिणींना सांगणं.कोणीही कुठेही गेला कि वाघ्याला हे आणलं,ते आणलं असायचंच.किती तरतऱ्हेचे पट्टे,कॉलर,भांडी, सगळं त्याच्यासाठी चालू असायचं.
२-३ वर्षांपासून त्याला काही तरी किरकोळ व्हायचं, डॉक्टरांनी बघून गेलं,कि औषधं सुरु व्हायची,हा बरा व्हायचा.केक मधून,केळ्यामधून औषधं,आईस्क्रीम देणं,असे लाड सुरूच असायचे.आता मात्र तो फार लवकर बरा दिसेना,कातडीवर जरा जास्तच चट्टे दिसायला लागले होते.त्याला काही त्रास होऊ नये हे मात्र वाटायचंच.

आम्हांला काय वाटतं आणि त्याला काय समजतं यात आम्ही कधी पडलोच नाही. आम्ही बोलत होतो,तो त्याचा अर्थ समजो किंवा नसेल समजलं तरी प्रतिसाद देत होता. कधी भुंकून,कधी शेपूट हलवून तर कधी शोध शोध असा शब्द ऐकून- ताबडतोब त्याच्या खाऊच्या कपाटाशी जाऊन आमची वाट पाहून.
त्याला जे म्हणायचं होतं, ते तो सांगत असेल.पण ते आम्हांला नाकारायचं असावं.त्याला आमचा, 'त्याच्या आमच्या' झालेल्या जगाचा निरोप घ्यायचा आहे,हे तो सांगण्याचा प्रयत्न करत असेलही. आम्ही ते ऐकायला मानायला तयार नव्हतो किंवा समजूनही नं समजल्यासारखं करत होतो! खरं पचवता येत नाही म्हणून त्याच्या सुचवण्याकडे जरा दुर्लक्ष करत होतो? मला आता तेच कबुल करायला लागणार आहे.कारण त्याला फसवून कधीच चालत नव्हतं. आमच्या मनातलं त्यालाही कळलंच होतं.त्यानी शनिवार रात्र,सर्व जण सोबत,बाबा घरात,मेधा ही आठ दिवसांनी आली-तिला भेटून मगच निरोप घेतला.
a
.