माझं मेळघाटला जाणं
पुणे ते बडनेरा रेल्वेनी गेलं की खूप मोट्ठ अंतर झोपेतच जातं. पण पुढे मात्र चिलाटी ला पोहचायला लागणारा वेळ फार वाटतो.त्यामुळे प्रत्येक वेळी मेळघाटला जाताना किती लांब जायचंय असं मनात यायचं. पण हल्ली मात्र हे वाटणं..बदललं आहे. परतवाडा आणि नंतर सीमाडोह सोडल्यावर अलीकडच्या प्रत्येक दौऱ्यावेळी मला चिलाटी फार लवकर आल्यासारखं वाटायला लागलंय. असं का बरं होतंय, म्हणून माझा मीच विचार करत असतांना काही गोष्टी सहज मनात आल्या ...
मेळघाटला १९९७ साली जेव्हा काम करायला म्हणून पहिल्यांदाच गेलो, तेव्हा ऑगस्ट महिना होता.प्रचंड पाऊस होता.ठिकठिकाणी वर घेतलेले पायवे नव्हते,छोटे पूल आणि रस्ते तर अजिबातच नव्हते. सीमाडोह च्या पुढे कुठेच दिवे नसायचे. रस्ता चुकलो आहोत की बरोबर आहे हे विचारायला कोणी भेटला तर बरं असं मनात येत असायचं. पण बस सुरु झालेली नसल्यामुळे रस्त्यात कोणी भेटेल असं नव्हतंच.
आमचे राम,चंदू,मधू पुण्याला आणि आपापल्या घरच्यांना फोन करायला शनिवारी परतवाड्यात येऊन रहायचे. तेव्हाच काय ती खुशाली समजायची. २००७ मधे मार्च महिन्यात आमच्या गावात फोन आला. काय वाटलं ते शब्दात सांगता येणार नाही असं होतं. नेमकं त्याचं पंधरवड्यात मी मेळघाटला चालले होते. ते ही वयस्क आई-वडील,मावशी यांना घेउन.तिथे फोन असणं याचं विशेष वाटलं. इतरांच्या संपर्कात रहाण्यासाठी ४-५ तास आणि एकंदर १-२ दिवस घालवावे लागत होते.आमचे कार्यकर्ते मनापसून काम करत होते आणि जंगल भागात राहत असल्यामुळे त्यांना या सुविधा मिळाल्या तर असं वाटत असतांना त्या मिळाल्या याचा आम्हाला खरा आनंद होता.
एका वर्षी सौरदिवे आणि सौर उर्जेवर काम करणारे संगणक आमच्याकडे सुरु झाले. तर एका वेळी सौर उर्जेवर चालणारा पाण्याचा पंप रुईपठार गावात आला. एक एक करत आमच्या गावांमध्ये थोडी थोडी सुधारणा दिसायला लागली. मग एका वर्षी आमच्याकडे आलेल्या पाहुण्यानी आमच्या प्रशिक्षण केंद्रासाठी एक दूरचित्रवाणी संच भेट दिला.
या सगळ्या सुविधा येत असतांना आमच्या झोपडीतून एका पक्क्या बांधणीच्या सेंटरमध्ये आम्ही आलो.आमच्या सेंटरवर जाणाऱ्या प्रत्येकाला स्वयंपाक करता यायला हवा किंवा मग लांबून पाणी आणणे वगैरे इतर कामे तरी करायची तयारी असणे आवश्यक होते.चुलीपाशी डोळे चोळत फक्त मूग डाळ-तांदूळ खिचडी हेच जेवण तिथे आम्ही जेवणारे... गावातल्या मुलीना शिकवून पोळी-भाजी,आमटी-भात जेवायला लागलो. हळू हळू फरक पडत चालला आहे.
हा फरक जस जसा पडतो आहे तसं तसं परतवाडा-चीलाटी खूप वाटणारं अंतर कमी कमी होत चाललं आहे. आत्ता मोजके बदल लिहिले आहेत. आणखी कितीतरी सांगण्याजोगे बदल आहेत. ते अंतर कमी कमी करत आहेत. फक्त थोडा शहाणपणा आणि माणुसकी असणाऱ्या,माहिती देऊ शकणारया माणसांची तिथल्या कोरकु आदिवासींना मदत हवी आहे....
मग तर ते अंतर आणखी कमी होत जाणार आहे.
How fortunate are you that you saw so many positive changes within a short span. Probably more has changed in the last 10 years as compared to the previous 100. Hoping the trend continues...
ReplyDeleteAge at marriage, No.of children in the family,Infant mortality, maternal mortality,birth rate,neonatal mortality, children out of school,children taking education in Ashramshalas ..to name the few... but literally everything is changing even in Melghat. Like this I can list out so many things drastically changing in remote villages where "MAITRI" has been working with Korku tribals in Melghat ....the world has changed twice in last ten years. But here the "world," is different.
ReplyDelete