Tuesday, 8 January 2013

पशू अधिक समंजस असतात....
वर्तमानपत्रात दररोज येणाऱ्या बातम्या पाहून अस्वस्थ वाटतं.पण तेव्हाच मनाची तयारी सुरु होते. एखाद्या प्रसंगात आपण काय करू, कसे वाचवण्याचा प्रयत्न करू,प्रतिकार कसा करता येईल,त्यासाठी शरीरिक तयारी लागेल आणि आणखी बरंच काही! ते सगळं कसं जमवायचं? कसं-कसं-मिळवायचं!

मला अगदी लहान असतांना आजी,आई-मावशी-काकू पासून शेजारच्या ताई पर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं  आठवतं. रस्त्यात,दुकानांत,भाजी घेताना आपल्या आसपास कोण आहे, कुठे उगाचच बघत बसलंय..नजर कशी आहे...मनात काही वाईट हेतू तर नाही याची पारख आपोआप येते. अगदी खरं आहे.त्यांनी बोललेलं ऐकूनच वावरताना अनेक प्रसंगाना तोंडही देत आल्या आहेत अनेकजणी. अजूनही देत आहेत.

आपल्या पर्स मध्ये मिरीपूड ठेवावी,लाल तिखट ठेवावं,खाजकुयली ठेवावी असं जरी सांगितलं जात असलं तरी आपल्या जवळ कायम असलेलं हत्यार म्हणजे आपले दात,नखं,तोंड याचा बिनाधास्त पणे वापर, आणि आपली नजर चाणाक्षपणे वापरणे.आपली सर्व तयारी ताजी ठेवणे.चाकू,सुरा याचाही वापर बिनदिक्कतपणे करता येणे ही काळाची गरज आहे.
निर्जनस्थळी एकट्याने न जाणे,पुरेशी माहिती घेउन मगच  अनोळखी व्यक्तीशी सावध संभाषण करणे.पुरेसा उजेड नसल्यास तिथे सावध असणे,अंगावर किंमती वस्तू असतांना गटात राहणे. अशा अनेक किल्या...
तरीही बेसावध असतांना एखादा प्रसंग आलाच तर तोंड देताना पूर्ण क्षमता वापरून हल्ला करणे.
मानवी वृत्ती पशुहून घातक असते हे वाचलेलं सध्या पुन्हा पुन्हा खरं ठरवणाऱ्या घटना वाचल्या ..तेव्हा वाटलं..सांगावं सगळयांना आपण  ही माणसंच आहोत.माणुसकीशून्य वर्तन संपूर्ण मानवजातीला काळीमा आणेल.जगात शरमेनी मान खाली घालायला लागेल.निसर्गानी दिलेल्या एकदाच मिळणाऱ्या मानवी देहाचा अपमान करून क्षणिक वासना शमवण्याची अमानवी वृत्ती अंतीमतःघातकच आहे.

2 comments:

  1. नक्कीच...
    म्हणूनच.. एखाद्या वाईट कृतीला 'पाशवी' म्हणणं चुकीचं आहे!

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete