शुभेच्छा कशासाठी !
दर वर्षी नियमित पणे पेट्रोल भाववाढ,रेल्वे तिकीट दरवाढ ,शाळा -महाविद्यालयांची फी वाढ -महागाई,टंचाई, भारताचा विकास दर आता संपूर्ण जगात अमुक अमुक क्रमांकावर अशा बातम्याही अगदी वर्षानु वर्षं तशाच त्याच पद्धतीनी येतात. गुन्ह्यांची संख्या,कोर्टातील प्रलंबित खटले,मुदती पुर्वीच संपणारे अधिवेशन,आणि लोकप्रतिनिधींच्या भत्यात मात्र वाढीची तरतूद.हे देखील दर वर्षी प्रमाणेच ...मागील पानावरून पुढे चालू.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून वर्ष संपणार म्हणून च्या गोष्टी सुरु होतात. कुठे धमाका तर कुठे लूट! पाक्षिकात,मासिकांत,सर्वत्र नवीन वर्षं सुरु होणार म्हणून मागोवा,आढावा,हिशेब मांडले जातात. अगदी वर्षानु-वर्ष असंच सुरु आहे.
अशा सर्व पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा मेसेज,इमेल, भेटकार्ड मात्र नेहेमी प्रमाणेच येऊन उभी ठाकलेली.आता त्यात मजा कसली... असं वाटत रहातं.
मग प्रश्न पडतो...दिनदर्शिकेचे पान संपून जाते..नवीन लावण्याची गरज असते एवढेच शिल्लक आहे का?
करण्याच्या कितीतरी गोष्टी तशाच आहेत.....यामुळे तरी आपण मागे वळून पहावं यासाठी तर हा सगळा..डाव नसेल... नाव मात्र गोंडस...नवं वर्षाच्या शुभेच्छा,!
नव वर्षाच्या शुभेच्छा .....:)
ReplyDelete