आधी ठरल्याप्रमाणे काल जेवायला ४ लोक येणार होते.अचानक काही कारणांनी दोघंच आले.घरात ल्या सर्वांना तेच परत खाण्याचा कंटाळा येणार,मला वाया घालवलेलं नाही चालणार. मग....
तिच भाजी दुसऱ्या दिवशी खाण्यापेक्षा कटलेट्स करुया ...संपून जाईल, असा विचार केला. त्यात थोडासा ब्रेड घातला. कांदा, आलं-मिरची-लसूण असं वाटण घातलं. कोथिंबीर घातली. टोस्टचा चुरा दोन्ही बाजूला लावून अगदी थोडसंच तेल घालून तव्यावर कटलेट्स भाजली. संध्याकाळी खायला केचप बरोबर मस्त लागली.भाजी संपली आणि ताजा नवा पदार्थही तयार झाला..तोही आवडणारा! असा आमचा कोंड्याचा मांडा वारंवार व्हावा अशीही चर्चा झाली.असंच आमटी वापरून भाजणीचं थालीपीठही अतिशय हलकं-खुसखुशीत होतं.अशा कितीतरी पदार्थांची आता माझ्याकडे यादीच तयार झाली आहे.
No comments:
Post a Comment